सोमण यांना रजेवर पाठविल्यामुळे राजकीय वातावरणही तापले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:16 PM2020-01-15T23:16:38+5:302020-01-15T23:17:11+5:30

मुंबई विद्यापीठातील या घडामोडींना विद्यार्थी संघटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण मिळत आहे.

The political atmosphere was also heated by sending Soman on leave | सोमण यांना रजेवर पाठविल्यामुळे राजकीय वातावरणही तापले

सोमण यांना रजेवर पाठविल्यामुळे राजकीय वातावरणही तापले

googlenewsNext

मुंबई : राहुल गांधी आणि स्त्रियांबद्दल सोशल मीडियातून अपमानास्पद टिप्पणी करणारे मुंबई विद्यापीठ अकॅडमी आॅफ थिएटर आर्ट (एमटीए)चे संचालक योगेश सोमण यांना अखेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये राजकीय वाद उफाळला असून, वातावरण तापले आहे.

एनएसयूआय, छात्रभारती सारख्या संघटनांनी याचे स्वागत केले आहे. एनएसयूआयने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे हा कायमस्वरूपी उपाय नसून, त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे, तर अभाविपकडून मात्र या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. योगेश सोमण यांच्यावरील कारवाई राजकीय प्रेरणेने करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अकॅडमी आॅफ थिएटर आर्टचे विद्यार्थी, छात्र भारती विद्यार्थी संघटना, एआयएसएफचे कार्यकर्ते यांनी १३ जानेवारी सकाळपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. सहा महिन्यांपासून नाट्य शास्त्राच्या मुलांना शिकविण्यासाठी प्रध्यापक नसल्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारधारा थोपविली जात आहे. हंगामी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भोंगळ कारभार करणाऱ्या एमटीएचे संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. सोमवारी रात्री ११.३० वाजता सोमण यांना रजेवर पाठवत असल्याचे पत्र कुलसचिवांनी आणून दिल्यानंतर, अकॅडमी आॅफ थिएटर आर्टच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. अभाविपकडून मात्र या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. सोमण यांच्यावरील कारवाईनंतर विभागातील विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

चौकशी करण्याची मागणी
मुंबई विद्यापीठातील या घडामोडींना विद्यार्थी संघटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण यांच्या बाबतीत जे घडते आहे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाहीत का? असा सवाल भाजप नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: The political atmosphere was also heated by sending Soman on leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.