मुंबई - कैद्याला आर्थर रोड कारागृहातून सुनावणीसाठी न्यायालयाऐवजी घरी नेणे पोलिसाच्या अंगलट आले आहे. कैद्याने घरातून पोलिसाच्या हातावर तुरी देत पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपी आवेश तंजीम अहमद आणि पोलिस शिपाई गहिनीनाथ काळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अहमद एका गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात न्यायबंदी होता. दिंडोशी येथील सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होती. कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्याची जबाबादारी सशस्त्र विभागातील काळे यांच्यावर होती. काळे यांनी सकाळी आर्थर रोड कारागृहातून अहमद याला पोलिस वाहनातून दिंडोशी न्यायालयात नेले. मात्र, तेथे न्यायालयात हजर करण्याऐवजी त्याला त्याच्या मागणीवरून आधी जोगेश्वरी येथील ‘लोढा बेल एअर’ या सोसायटीतील घरी नेले. तेथे त्याचे कुटुंबीय आणि वकील उपस्थित होते. तेथे सुनावणीपूर्वी न्यायालयात पोहोचू, असेही आश्वासन अहमद याने दिले. परंतु, तेथून संधी साधून अहमदने पळ काढला. या प्रकारामुळे काळे यांना धडकी भरली. अहमदचा त्यांनी शोध घेतला; मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब समजताच खळबळ उडाली.
दहा हजारांचा मोह अंगलट? - ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी अहमदसह काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. काळे यांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवला असून, त्याला भारतीय नागरी सुरक्षा संहिता ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे.- लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अहमद याने काळे यांना १० हजार रुपयांचे प्रलोभन दाखविले होते. धक्कादायक बाब म्हणजे काळे वर्दीत असल्याने त्याने आरोपीला एकटेच वर सोडले. - तो इमारतीखालीच वाट पाहत थांबल्याची माहिती समोर येत आहे. दहा मिनिटांत अहमद खाली येणार होता. मात्र तो न परतल्याने काळे वर गेले तेव्हा अहमद पसार झाल्याचे समजते. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.
Web Summary : A prisoner escaped after a policeman took him home instead of court for a hearing. The cop, enticed by a bribe, now faces charges along with the escapee. Police investigation is underway.
Web Summary : एक पुलिसकर्मी कैदी को सुनवाई के लिए अदालत की बजाय घर ले गया, जिसके बाद कैदी फरार हो गया। रिश्वत से आकर्षित होकर पुलिसकर्मी पर भी आरोप लगे हैं। पुलिस जांच जारी है।