‘लोकमत’च्या वृत्तानंतर पोलिसांचे धाडसत्र सुरु
By Admin | Updated: February 7, 2016 00:17 IST2016-02-07T00:17:18+5:302016-02-07T00:17:18+5:30
महानगरात राजरोसपणे सुरु असलेल्या अंमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे मांडल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यासाठी चार पथक तैनात करण्यात

‘लोकमत’च्या वृत्तानंतर पोलिसांचे धाडसत्र सुरु
मुंबई : महानगरात राजरोसपणे सुरु असलेल्या अंमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव ‘लोकमत’ने स्टिंगद्वारे मांडल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यासाठी चार पथक तैनात करण्यात आली असून घाटकोपरमधून १ किलो ३० ग्राम गांजासह दक्षिण उपनगरातून १० गर्दुले व विक्रेते ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यत पोलिसांनी शोध मोहीम सुरु होती.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी, मानखुर्द, बैंगणवाडी आणि रे रोड परिसरात शनिवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे चार पथक रवाना करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले. परिणामी अमंलीपदार्थ विक्रेत्यांसह तस्करांचे धाबे दणाणले आहेत. घाटकोपर येथून १ किलो ३० ग्रम गांजा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणच्या करबला मैदानाच्या परिसरात पोलिसांनी पाळत सुरु ठेवली आहे. त्या पाठोपाठ रे रोड सहित १० वेगवेगळ्या ठिकाणांहून १० गर्दुल्ले आणि पेडलरना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ कोठून आणले, याबाबत सविस्तर तपास करण्यात येत आहे. पथकाने हाती घेतलेल्या कारवाईने अंमलीपदार्थांच्या विक्रीला चाप बसणार आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व उपनगरात त्यांच्या पथकाने गस्त घालण्यास सुरुवात केली. हे धाडसत्र सुरु राहणार असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.
महानगरात राजरोसपणे सुरु असलेल्या अंमलीपदार्थांच्या विक्रीचे वास्तव ६ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने मांडले होते...