गर्दुल्ल्यांचा करणार बंदोबस्त; पोलिसांची संयुक्त विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:05 IST2026-03-01T05:05:20+5:302026-03-01T05:05:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील उद्याने आणि खुल्या जागांमधील अमली पदार्थांचा धोका रोखण्यासाठी मुंबई ...

गर्दुल्ल्यांचा करणार बंदोबस्त; पोलिसांची संयुक्त विशेष मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील उद्याने आणि खुल्या जागांमधील अमली पदार्थांचा धोका रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलीसांमार्फत एक विशेष संयुक्त मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. चर्चेत अबूआझमी, अमित साटम, मुरजी पटेल, अनंत नर, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.
सार्वजनिक ठिकाणे लक्ष्य
उद्याने आणि खुल्या जागा अमली पदार्थ पिणाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली. रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांनंतर सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे यांचा सामना करावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी बागांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. उद्यानांमधील सीसीटीव्ही कॅमेरे स्थानिक पोलीस ठाण्यांशी जोडले जावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शौचालये आणि उभी असलेली वाहने अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरली जात आहेत.
यावर मंत्री देसाई म्हणाले,मेस्कोच्या माध्यमातून अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील.