मुलुंडमध्ये थरार! पोलीस अधिकारी, गुंडांमध्ये झटापट; सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून अचानक गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 21:28 IST2022-02-22T21:24:25+5:302022-02-22T21:28:05+5:30
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आले असताना पोलिसांची गुंडांसोबत झटापट

मुलुंडमध्ये थरार! पोलीस अधिकारी, गुंडांमध्ये झटापट; सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून अचानक गोळीबार
मुंबई: मुलुंडच्या अमर नगर परिसरामध्ये मीरा भाईंदरच्या पेल्हारमधील एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या क्राईम ब्रँच युनिट 1 च्या अधिकाऱ्यांमध्ये आणि गुंडांमध्ये झटापट झाली आणि या झटापटीत पोलिसांच्या सर्विस रिव्हॉल्वर मधून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
18 फेब्रुवारी रोजी पेलार येथे सुपारीचा ट्रक लुटून तो माल अमर नगर परिसरात लपवला असल्याची माहिती मीरा-भाईंदर क्राईम ब्रँच युनिट एकला मिळाली होती. त्याचाच तपास करत या युनिटचे अधिकारी अमर नगर मधील गोडाऊन पर्यंत पोहोचले होते. यावेळी या ठिकाणी दबा धरून असलेल्या आरोपींची पोलिसांसोबत झटापट झाली आणि या झटापटीमध्ये पोलिसांच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळीबार झाला. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून आतापर्यंत चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि एक कोटी रुपये किमतीचा सुपारीचा मालदेखील घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला आहे.