गुरे चोरणार्‍या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश

By Admin | Updated: May 22, 2014 04:07 IST2014-05-22T04:07:11+5:302014-05-22T04:07:11+5:30

वाड्यात बांधून ठेवलेल्या बकर्‍यांना मध्यरात्रीच्या सुमारास गुंगीचे इंजेक्शन देवून टाटा जीप, टेम्पोत कोंबून पळवून नेणार्‍या एका टोळीने धुमाकूळ घातला

Police failure to catch the thieves | गुरे चोरणार्‍या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश

गुरे चोरणार्‍या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश

शौकत शेख, डहाणू - डहाणू, तलासरी तालुक्याचा ग्रामीण तसेच खेडोपाड्यात गेल्या एक वर्षापासून रस्त्यावरील मोकाट जनावरे तसेच घराच्या गोठ्यात, वाड्यात बांधून ठेवलेल्या बकर्‍यांना मध्यरात्रीच्या सुमारास गुंगीचे इंजेक्शन देवून स्कार्पिओ, टाटा जीप, टेम्पो तसेच क्वालीस या वाहनात कोंबून पळवून नेणार्‍या एका टोळीने धुमाकूळ घातला असून या चोरी करणार्‍या टोळीला पकडण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना अपयश आले आहे. याबाबत पोलिसांत सातत्याने तक्रारी करूनही गुन्हेगाराचा छडा लागत नसल्याने पोलिसांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित येणार्‍या कासा, घोलवड, डहाणू, वाणगांव, तलासरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वर्षभरापासून बैल, गायी, बकर्‍या चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे. चिंचणी, वाणगांव, कासा, आंबेसरी, चरी, कोरबी, आशागड, गंजाड, वधना, बोर्डी, तलासरी, वेवती, धुंदलवाडी, एैना, साखरे, घोलवड, धानोरी, सायवन, कोसबाड, महालक्ष्मी, चिंबावे या भागात रस्त्यावर भटकणारी मोकाट गुरे रात्रीच्या सुमारास वाहनांमध्ये कोंबून इतरत्र पळविली जात आहे. याबाबतीत पोलिसांना माहिती असतानाही ही चोरीच्या गुरांची वाहनांतून होणारी वाहतूक मात्र अद्याप थांबू शकलेली नाही. बैल, बकर्‍या चोरणारी ही टोळी रस्त्यावरच वाहन दुरुस्ती करीत असल्याच्या बहाण्याने गुरे वाहनात भरण्याचा उद्योग सुरू ठेवतात. सहा महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळीस काही अज्ञात आरोपी गुरे पकडत असताना काही नागरिकांनी प्रतिकार केला होता. त्यावेळी वाहनात बसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या टोळीने धारदार शस्त्रे बाहेर काढली होती. त्यामुळे गुरे चोरणार्‍या या टोळीचा कोणीही प्रतिकार करीत नाही. (वार्ताहर)

Web Title: Police failure to catch the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.