चौघांवर पोलीस आरोपपत्र ठेवणार !

By Admin | Updated: January 30, 2016 02:04 IST2016-01-30T02:04:20+5:302016-01-30T02:04:20+5:30

बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील चौघा नगरसेवकांविरुद्ध लवकरच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Police charge sheet against four | चौघांवर पोलीस आरोपपत्र ठेवणार !

चौघांवर पोलीस आरोपपत्र ठेवणार !

ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील चौघा नगरसेवकांविरुद्ध लवकरच ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी कागदपत्रांची छानणी आता अंतिम टप्प्यात आल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. परमार यांनी ७ आॅक्टोबर २०१५ रोजी घोडबंदर रोड येथील त्यांच्या एका प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅटमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
अहवालातून काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष नजीब मुल्ला, तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि मनसेचे माजी गटनेते सुधाकर चव्हाण यांची नावे उघड झाली होती. चौघेही ५ डिसेंबर रोजी शरण आल्यानंतर त्यांना अटक केली.
या चौघांनाही ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police charge sheet against four