Join us

पोलिसांना प्रतीक्षा अग्निशमनच्या अहवालाची, भांडुपच्या रुग्णालयातील आग प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 06:28 IST

२५ मार्चला ड्रीम्स मॉल, सनराइज रुग्णालयाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या लॅबमध्ये सर्वांत आधी आग लागली, त्यानंतर ती सर्वत्र पसरल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : भांडुप ड्रीम्स मॉलमधील सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीप्रकरणी भांडुप पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अहवालातून आगीचे नेमके कारण समोर येईल, त्यामुळे सध्या पोलीस या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.२५ मार्चला ड्रीम्स मॉल, सनराइज रुग्णालयाला आग लागली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या लॅबमध्ये सर्वांत आधी आग लागली, त्यानंतर ती सर्वत्र पसरल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी मॉलचे संचालक राकेशकुमार वाधवान, डॉ. निकिता त्रेहान, सारंग वाधवान, दीपक शिर्के, रुग्णालय संचालक अमितसिंग त्रेहान, स्विटी जैन, व्यवस्थापनांतील जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. आगीचे कारण काय? ती कशी लागली?  याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.  

४५० गाळे जळून खाकआगीत ४५० गाळे जळून खाक झाले. त्यांचे एकूण किती नुकसान झाले, याबाबतही पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :आगमुंबई