Join us
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षांवरील पोलिसांना रस्त्यावर ड्यूटी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:08 IST

आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.  आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे दुपारच्या सुमारास ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भरउन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलिस त्यांना दिसले. यातील अनेक पोलिस हे वयाने ज्येष्ठ असूनही भरउन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. ते पाहून त्यांनी  पोलिस आयुक्तांना फोन केला व यापुढे ५५ वर्षांवरील पोलिसांना भरउन्हात रस्त्यावर तैनात करू नये, असे निर्देश दिले.  

टॅग्स :पोलिससरकारराज्य सरकार