Join us

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:04 IST

प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोर्टाची ईडीला परवानगी

मुंबई: पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मुंबईतील पीएमएलए कोर्टानं मंजुरी दिली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता. प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी यामधून मागण्यात आली होती. या अर्जाला कोर्टानं मंजुरी दिल्यानं नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग काही प्रमाणात सुकर होणार आहे.  

नीरव मोदीनं पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा गंडा घातला आहे. हा घोटाळा उघड होताच नीरव मोदी फरार झाला आहे. नीरव आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचलनालयानं नीरव विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यानंतर अंमलबजावणी संचलनालयानं गेल्या आठवड्यात या घोटाळ्यातील आरोपींविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अपील केलं होतं. यानंतर पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश सलमान आजमी यांनी नीरव आणि 10 जणांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं. 

 

टॅग्स :नीरव मोदीमुंबईपंजाब नॅशनल बँक घोटाळान्यायालय