Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा दौरा सुफल; PM मोदी रवाना, भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ, मॅक्रॉन यांची भेट ठरली विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 23:43 IST

PM Modi Mumbai Tour News: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाले.

PM Modi Mumbai Tour News: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे दोन्ही नेते मुंबईत होते. या दोन्ही नेत्यांनी दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला. संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा व इंडो-पॅसिफिक सहकार्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा होता. संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईतून रवाना झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी उपस्थित होते. 

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदी यांना निरोप दिला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाले. 

२०२६ हे वर्ष भारत आणि युरोपमधील संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा 

२०२६ हे वर्ष भारत आणि युरोपमधील संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. युरोपियन युनियनसोबतचा मुक्त व्यापार करार भारत-फ्रान्स संबंधांनाही अभूतपूर्व गती देईल. आम्ही दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी एक करार केला आहे, ज्यामुळे आमच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढेल. २०२६ हे वर्ष भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरे करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या भागीदारीचे रूपांतर लोकांच्या भागीदारीत करत आहोत!, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील सौहार्दपूर्ण संबंधांवर भर दिला. तसेच फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून, आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व ऊर्जा दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi's Mumbai Visit Successful; Strengthens India-France Ties

Web Summary : PM Modi and President Macron's Mumbai visit strengthened India-France relations. Discussions spanned defense, technology, and Indo-Pacific cooperation. Modi emphasized the 2026 India-France innovation year and deeper strategic partnership, departing from Mumbai afterward.
टॅग्स :मुंबईफ्रान्सनरेंद्र मोदी