पंतप्रधान मोदी आज मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:45 IST2018-06-26T05:45:21+5:302018-06-26T05:45:29+5:30

पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील.

PM Modi in Mumbai today | पंतप्रधान मोदी आज मुंबईत

पंतप्रधान मोदी आज मुंबईत

मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील.
मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमात ते सहभागी होतील. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहतील. यानंतर
पंतप्रधान राजभवनात उद्योगपतींशी चर्चा करतील.

Web Title: PM Modi in Mumbai today