कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:58 IST2025-06-20T19:44:37+5:302025-06-20T19:58:32+5:30

Western Railway : पालघर स्थानकात ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी दोन ते तीन तास लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Plight of workers returning from work; Western Railway traffic disrupted due to broken overhead wire | कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वे च्या पालघर रेल्वे स्थानकावर मुंबई कडून अजमेरकडे जाणारी अजमेर एक्सप्रेस तीन नंबर प्लॅटफॉर्मवर येत असताना ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी दोन ते तीन तास लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई कडून अजमेर कडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पालघरच्या ३ नंबर प्लॅटफॉर्मवर येत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटल्याने गाडीच्या चालकाने हॉर्न वाजवून सर्वांना सतर्क केले. ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणारी आणि गुजरातकडे जाणारी दोन्ही मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या तसेच उपनगरीय लोकल सेवा वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून  ठेवण्यात आल्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा काही वेळेसाठी ठप्प पडली असून, पालघर डहाणू तालुक्यातून आपल्या घराकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडून पालघर-डहाणू या भागातील आपल्या घराकडे जाणाऱ्या चाकरमान्याचे मोठे हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प पडल्याने पश्चिम रेल्वेची दुरुस्तीसाठी येणारी व्हॅन आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास या दुरुस्तीसाठी लागणार असल्याचे रेल्वे सुत्रांनी सांगितले. या  घटनेनंतर विविध रेल्वे स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस थांबवून ठेवल्याने रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते.

Web Title: Plight of workers returning from work; Western Railway traffic disrupted due to broken overhead wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.