पार्श्वगायक तिवारी अटकेत

By Admin | Updated: May 9, 2014 01:35 IST2014-05-09T01:35:19+5:302014-05-09T01:35:19+5:30

गायक अंकित तिवारी (वय २४) आणि धमकावल्याप्रकरणी त्याचा भाऊ अंकुर (२६) यांना आज वर्सोवा पोलिसांनी अटक केली.

Playback singer Tiwari detained | पार्श्वगायक तिवारी अटकेत

पार्श्वगायक तिवारी अटकेत

मुंबई : विवाहाचे वचन देत युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ‘आशिकी २’ या चित्रपटातील ‘सुन रहा है ना तू’ या हिट गाण्याचा गायक अंकित तिवारी (वय २४) आणि धमकावल्याप्रकरणी त्याचा भाऊ अंकुर (२६) यांना आज वर्सोवा पोलिसांनी अटक केली. अंकित हा उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी असून अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत. ‘आशिकी २’मधील गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २१ जुलै २0१३ रोजी आपल्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंकितने आपल्याला मद्यप्राशन करण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर नशेत असताना बोलायचे असल्याचा बहाणा करीत त्याने आपल्याला बेडरूममध्ये नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरातील मंदिरासमोर कपाळाला सिंदूूर लावत लग्न केल्याचे भासवले. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सोशल नेटवर्किंग साइटवर तसेच मित्रांना दाखवण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवले. मात्र आई-वडील लग्नासाठी संमती देत नसल्याचे कारण पुढे करीत लग्न करण्याचे टाळले, अशी पीडित तरुणीची तक्रार आहे. तसेच अंकितचा भाऊ अंकुर याने चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. आज दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अंकितला १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अंकुर याची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Playback singer Tiwari detained