Join us

एसटीच्या चालक केबिनचे प्लास्टिक शिल्ड फाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 18:34 IST

प्लास्टिक शिल्ड फाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालकांच्या सुरक्षेची कडा तुटली आहे.

मुंबई : एसटी महामंडळाच्या एसटी बस चालकाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त केला होता. मात्र काही कालावधीतच हे प्लास्टिक शिल्ड फाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालकांच्या सुरक्षेची कडा तुटली आहे.

लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाच्यावतीने अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका पत्करून एसटी बसचे चालक-वाहक अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बेस्टसारखी संकल्पना तयार केली. एसटी महामंडळाच्या एसटी बस चालकाच्या कॅबिनला आयसोलेशनमध्ये रूपांतर करण्याची सुरुवात केली. चालकाच्या कॅबिनचा दरवाजा पारदर्शक प्लास्टिक शिल्ड लावून बंदिस्त केले. मात्र आता प्लास्टिक शिल्ड गळून पडले आहेत. 

अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात दररोज एसटीच्या फेऱ्या धावत आहेत. मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे कर्मचार्यांनामध्ये कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चालकाच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच व्यवस्था केली. ज्यामुळे प्रवासी आणि चालकाचा संपर्क होणार नाही. एसटी महामंडळाच्या यंत्र आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांनी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटीच्या सुमारे ११० एसटी बसला हि सुविधा बसविण्यात आली होती. यामध्ये मुंबई विभागातील सर्वाधिक गाड्या आहेत. 

 

टॅग्स :रस्ते वाहतूकरस्ते सुरक्षाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस