मुंबई : नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्री व वापरावर राज्य सरकार कारवाईचा बडगा उगारणार आहे. राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदा आधीपासून अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी अधिक स्पष्ट आणि परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढण्याची तयारी सुरू आहे. या नव्या आदेशानुसार प्लास्टिक फुलांचे उत्पादन, विक्री तसेच सजावटीसाठी त्यांचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
नैसर्गिक शेतीला फटका
प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक शेतीला फटका बसला आहे.
कारवाई सुरूच राहणार
गेल्या वर्षभरात प्लास्टिकविरोधी कारवाईदरम्यान सुमारे १,२०० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले असून १३० गुन्हे दाखल आहेत. नवा शासन निर्णय काढण्यात आल्यानंतर प्लास्टिक फुलांचे उत्पादन करणारे, विक्रेते, डेकोरेटर तसेच अशा सजावटीस परवानगी देणाऱ्या मंगल कार्यालयांवर थेट फौजदारी कारवाई होणार आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका
प्लास्टिक फुलांमध्ये शिशा (लेड) यांसारख्या घातक रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
दीर्घकाळ संपर्क आल्यास मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असून, कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे.
शिवाय हे प्लास्टिक नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. दरम्यान प्लास्टिकविरोधात शासन कारवाईची मोहीम राबवत असते, मात्र नव्या शासननिर्णयानंतर ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे.
कृत्रिम फुलांचा पर्यावरणावर परिणाम
मंगल कार्यालयांकडून या कृत्रिम फुलांची सर्रास सजावट केली जाते. मात्र, अशा सजावटीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
राज्य सरकार प्लास्टिक फुलविक्रीवर बंदीची अंमलबजावणी करणार असल्याने आमच्यासाठी चांगले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेतल्याने आता योग्य प्रकारे अंमलबजावणी होईल, असा विश्वास आहे. प्लास्टिक फुलांमुळे नैसर्गिक फूलविक्रेत्यांना मोठे नुकसान सोसावे लागते.सोपान शेठ, नैसर्गिक फूल विक्रेते, दादर फूल मार्केट
Web Summary : Maharashtra cracks down on plastic flowers. Production, sales, and usage for decoration will face criminal charges. Natural farming suffers, cancer risk increases. Over 1,200 kg seized last year.
Web Summary : महाराष्ट्र में प्लास्टिक के फूलों पर कार्रवाई। सजावट के लिए उत्पादन, बिक्री और उपयोग पर आपराधिक आरोप लगेंगे। प्राकृतिक खेती को नुकसान, कैंसर का खतरा बढ़ता है। पिछले साल 1,200 किलो से अधिक जब्त।