Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahaparinirvana Din 2025: महापरिनिर्वाण दिनासाठी दादर स्टेशनवर नियोजन, ४०० पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची फौज तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:46 IST

Mahaparinirvan Din 2025 News: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ४०० लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, ५ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी रात्री १२ या कालावधीत दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश देण्यात येतील.  

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे ४०० लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दादर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. 

फलाटावर प्रवेश करण्यासाठी असे असेल नियोजन

मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा  मोठा ब्रिज व फलाट क्र. १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येण्यासाठी बंद राहील. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी पूल खुला राहील. 

पूर्व-पश्चिम शहर हद्दीतून येणाऱ्या अनुयायी व दैनंदिन रेल्वे प्रवाशांसाठी दादर रेल्वे स्थानकांवरील फलाटावर येण्याकरिता खुला राहील.

दादर पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्र. १ वरील स्कायवॉक ब्रिजलगतचे गेट क्र.१, ६ व ७ वगळता सर्व प्रवेशद्वार हे रेल्वे प्रवासी व अनुयायांना शहर हद्दीतून फलाटावर येण्यास बंद राहतील.

दादर पश्चिम रेल्वेस्थानक फलाट क्र. १ वरील लंगडा/आंधळा पादचारी पूल शहर हद्दीतून येणाऱ्या रेल्वे प्रवासी व अनुयायांना पश्चिमेकडून पूर्वकडे जाण्यास बंद राहील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dadar Station Security Plan for Mahaparinirvan Day: 400 Police Deployed

Web Summary : Limited access at Dadar station for Mahaparinirvan Day. 400 railway police officers will be deployed to maintain order. Certain entry points to platforms will be closed, while others remain open for commuters and followers. Measures are in place to manage passenger flow effectively.
टॅग्स :दादर स्थानकमुंबई पोलीसमुंबई लोकलडॉ. बाबासाहेब आंबेडकर