टिटवाळ्यात गंठणचोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच
By Admin | Updated: May 19, 2014 22:33 IST2014-05-19T22:04:27+5:302014-05-19T22:33:39+5:30
येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणार्या महिलांना हेरून दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील गंठण खेचून पोबारा करण्याचे प्रमाण वाढले आहे

टिटवाळ्यात गंठणचोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच
टिटवाळा - येथील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणार्या महिलांना हेरून दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील गंठण खेचून पोबारा करण्याचे प्रमाण वाढले आहे.
रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास येथील वाणीअळीतील धनश्री दलाल यांचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र दोन मोटारसायकलस्वारांनी चोरून नेले. हे चोर काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आले होते. त्यातील चालकाने लाल रंगाचा शर्ट व हेल्मेट घातले होते. चार दिवसांपूर्वी विघ्नहर्ता अपार्टमेंटमधील योगेश गोटे यांच्या घरात दुपारी ३ च्या सुमारास चोरी झाली. यात दोन लाखांपर्यंत सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरीला गेला. अशा प्रकारच्या गंठण व घरफोडीच्या घटनांचे सत्र काही महिन्यांपासून सुरू आहे. पोलिसांकडून या चोर्यांचा तपास लागत नसल्याचा सूर येथील नागरिकांतून निघत आहे.