Join us

मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान घसरले; मोठा अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 01:47 IST

जयपूर - मुंबई स्पाइस जेट SG 6237 विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरले.

मुंबई : मुसळधार  पावसामुळे मुंबई विमानतळावरस्पाइस जेटचे विमान घसरल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. 

जयपूर - मुंबई स्पाइस जेट SG 6237 विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर काही अंतरावर जाऊन थांबले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना हा प्रकार घडला. मात्र, यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरवली जात आहेत.  काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला असून या विमानांना बंगळुरु, अहमदाबाद सह दुस-या विमानतळावर वळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :स्पाइस जेटविमानतळ