Join us  

शहरीकरणाच्या प्रक्रियेत भौतिक व सामाजिक समतोल महत्त्वाचा - सुरेश प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:40 PM

प्रभावी शहरनियोजनाची, नागरी योजनांची आखणी व अमंलबजावणी करणे गरजेचे आहे, व तसे करत असताना भौतिक व सामाजिक समतोल साधणे अधिक महत्त्वाचे आहे,

मुंबई : भारतातील व जगातील विविध देशांमधील शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. परिणामी प्रभावी शहरनियोजनाची, नागरी योजनांची आखणी व अमंलबजावणी करणे गरजेचे आहे, व तसे करत असताना भौतिक व सामाजिक समतोल साधणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सुरेश प्रभू यांनी केले. प्लानोग्राम या ई-उपक्रमामार्फत नुकतेच माजी केंद्रीय रेल्वे मंत्री व सध्या जी-२० देशांमधील भारतीय प्रतिनिधी असलेले सुरेश प्रभू यांचे शहरीकरण व युवकांसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सुरेश प्रभू म्हणाले, जगातील बरीचशी शहरे आता महानगरांत रूपांतरीत झाली आहेत. त्यायोगे शहरांचे स्वरुप बदलले असून सार्वजानिक वाहतूक, आरोग्य, ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती घटकांशी निगडित समस्या अधिक जटिल व क्लिष्ट बनल्या आहेत. त्यातच लोकसंख्यावाढ, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, बदलती जीवन शैली असे अनेक मुद्दे आव्हानात्मक बनत जात आहेत. मात्र या समस्यांवर प्रभावी तोडगा काढून शहरी जीवन सुकर बनवण्यात भारताची युवा पिढी सक्षम व सुसज्ज बनते आहे. देशातील व परदेशांतील नागरी योजना, नगर नियोजन आणि निगडित मुद्द्यांवर विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घरबसल्या उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी प्लानोग्राम उपक्रमाचे पीयूष गिरगांवकर यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :मुंबईभारतमहाराष्ट्र