Join us

फोटो व्हायरलची धमकी; मुलीने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 11:15 IST

आत्महत्येपूर्वी संबंधित मुलगी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास धाकटी बहीण आणि मैत्रिणीसोबत परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी प्रियकराने खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या तणावातून सोळा वर्षीय मुलीने बीडीडी चाळीतील एका इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आयुष्य संपविले आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

आत्महत्येपूर्वी संबंधित मुलगी रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास धाकटी बहीण आणि मैत्रिणीसोबत परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. दरम्यान, माजी प्रियकर शुभम जाधव तेथे आला. त्याने मुलीशी वाद घालत कानाखाली लगावली. मुलीने मामाला बोलविणार असल्याचे सांगताच त्याने दोघानांही जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, जवळील खासगी फोटो तिच्या मैत्रिणीस, बहिणीला दाखवत व्हायरल करण्याची धमकी दिली. याच, तणावातून १६ वर्षीय मुलीने घरी आल्यानंतर  रात्री साडेनऊच्या सुमारास गच्चीवरून उडी घेत आयुष्य संपविले आहे. 

या प्रकरणी मृत्यूची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला. सोमवारी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जाधव विरुद्ध गुन्हा नोंदविला असून, जाधवला ताब्यात घेतले आहे. शुभम याची पोलिस चौकशी करीत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या घरच्यांचाही जबाब घेऊन त्यातून काही माहिती मिळते का या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी