With photo : वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ, घरगुती गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:06 IST2021-02-07T04:06:37+5:302021-02-07T04:06:37+5:30

मुंबई : माझी मुंबई - माझी काँग्रेस - १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रमांतर्गत पहिली पदयात्रा प्रतीक्षानगर, सायन कोळीवाडा व ...

With photo: Rising inflation, unemployment, petrol and diesel price hike, march against domestic gas price hike | With photo : वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ, घरगुती गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा

With photo : वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ, घरगुती गॅस दरवाढीविरोधात पदयात्रा

मुंबई : माझी मुंबई - माझी काँग्रेस - १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रमांतर्गत पहिली पदयात्रा प्रतीक्षानगर, सायन कोळीवाडा व अँटॉप हिल विभागात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे काढण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या हस्ते झाला.

वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ, तसेच घरगुती गॅस दरवाढ या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबईतील २२७ वॉर्डांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. भाई जगताप म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारमुळे वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ, तसेच घरगुती गॅस दरवाढ याविरोधात रविवारी सकाळी ९ वाजता दादर पूर्वेला स्थानकासमोर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, सचिव आशिष दुआ, कचरू यादव, गणेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता उपस्थित होते.

Web Title: With photo: Rising inflation, unemployment, petrol and diesel price hike, march against domestic gas price hike