Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरात पेट्रोल 5, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 08:03 IST

आज पेट्रोल 13, तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त

मुंबई: आजही देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून इंधनाच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात 13 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.94 रुपये मोजावे लागतील. डिझेलचे दरदेखील 12 पैशांनी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत एक लिटर डिझेलचा दर 75.64 रुपयांवर आला आहे.पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका? ऑक्टोबरपासून इंधनाच्या दरात घट होत आहे. 13 ऑक्टोबरला मुंबईत एक पेट्रोलचा दर 88.12 रुपये इतका होता. गेल्या महिन्याभरात पेट्रोल 5.18 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेलच्या दरात 3.18 रुपयांनी कपात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत असल्यानं सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसोबतच दिल्लीतही आज पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 13 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 77.43 रुपये मोजावे लागतील. तर डिझेलच्या दरात 12 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 72.19 रुपयांवर आला आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेल