Join us

सलग चौदाव्या दिवशी इंधन दरवाढ, पेट्रोल 15 पैशांनी महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 08:00 IST

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबई -  कर्नाटक निवडणुकीनंतर सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या प्रतिलिटर दरामध्ये 15 पैसे तर डिझेलच्या प्रतिलिटर दरात 17 पैशांनी वाढ झालीय आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 85 रुपये 96 पैशांवर पोहोचले आहेत. या  इंधन दरवाढीमुळे महिन्या भराचं बजेट कोलमडत असल्यानं सर्वसामान्यांच्या रागाचा भडका उडत आहे. 

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. तसंच मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचं आश्वासन दिलं. मात्र, इंधन दरवाढीची कटकट कधी संपणार?, हा प्रश्न निरुत्तरितच आहे. दरम्यान, देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. 

(हे आहे सत्य... मोदी सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज 'फेडलं' नाही, फक्त 'पोहोचवलं'!)

असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर - १५ मे - ८२.७९ रुपये१६ मे - ८२.९४ रुपये१७ मे - ८३.१६ रुपये१८ मे - ८३.४५ रुपये१९ मे - ८३.७५ रुपये२० मे - ८४.०७ रुपये२१ मे - ८४.४० रुपये२२ मे - ८४.७० रुपये२३ मे - ८४.९९ रुपये२४ मे - ८५.२९ रुपये२५ मे - ८५.६५ रुपये२६ मे - ८५.७८ रुपये२७ मे - ८५.९६ रुपये 

टॅग्स :पेट्रोलडिझेल