कोकणवासीयांचा विशेष रेल्वेला अल्प प्रतिसाद, निर्णयाला उशीर झाल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:55 AM2020-08-17T04:55:45+5:302020-08-17T06:54:29+5:30

तर दुस-या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळपर्यंत ४० ते ४५ टक्केच आसने भरल्याचे रेल्वे अधिका-याने सांगितले.

The people of Konkan did not respond to the special train, which resulted in a delay in the decision | कोकणवासीयांचा विशेष रेल्वेला अल्प प्रतिसाद, निर्णयाला उशीर झाल्याचा परिणाम

कोकणवासीयांचा विशेष रेल्वेला अल्प प्रतिसाद, निर्णयाला उशीर झाल्याचा परिणाम

Next

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १५ आॅगस्टपासून विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी पहिल्या दिवशी या गाड्यांच्या एकूण आसनांपैकी २५ टक्के आसने भरली होती, तर दुस-या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळपर्यंत ४० ते ४५ टक्केच आसने भरल्याचे रेल्वे अधिका-याने सांगितले.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी काही दिवस आधीच चाकरमानी गावी जातात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला. त्यामुळे कोकणात जाणारे प्रवासी त्यापूर्वीच खासगी वाहने, एसटी अशा प्रकारे रस्तामार्गे कोकणात पोहोचले. शिवाय कोरोनाच्या भीतीने अनेकांनी कोकणात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेची मोठ्या प्रमाणात आसने रिक्त आहेत, असे एका रेल्वे अधिकाºयाने सांगितले.
‘रेल्वेला वेगळा न्याय का?’
एसटी बस, खासगी बस आणि इतर वाहनांमधून आता प्रवास करताना कोरोना चाचणी आवश्यक आहे. मात्र, हा नियम रेल्वेला लागू नाही. हे असे का केले जात आहे, असा सवाल मुंबई बस मालक संघटनेचे चिटणीस हर्ष कोटक यांनी उपस्थित केला आहे.
>१३ आॅगस्टपासून एसटीही रिकामी
गणेशोत्सवासाठी १२ आॅगस्टपर्यंत कोरोना चाचणीशिवाय प्रवाशांना एसटीतून कोकणात जाता येत होते. तोपर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक जणांनी एसटीतून प्रवास केला. मात्र १३ आॅगस्टपासून प्रवासासाठी कोरोना चाचणी आवश्यक करण्यात आल्याने चाकरमान्यांनी एसटीचा प्रवास टाळल्याचे
दिसते आहे. प्रवाशांअभावी गुरुवार ते शनिवार एकही गाडी सुटू शकली नाही. त्यानंतर रविवारी ठाणे येथून एकमेव बस सुटली, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
>आधीच पोहोचले गावी
गणेशोत्सव २२ आॅगस्टला आहे आणि १५ आॅगस्टला विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या. त्यामुळे उशिराने सुरू झालेल्या गाड्या, त्याने गावात पोहोचल्यावर लागू होणारे विलगीकरणाचे नियम याचा विचार करून चाकरमानी रेल्वेची प्रतीक्षा करण्यापेक्षा खासगी बस, एसटीतून आधीच कोकणात दाखल झाल्याचे एका रेल्वे अधिकाºयाने सांगितले.
>परतीच्या प्रवासासाठी रेल्वेलाच असेल प्राधान्य
उशिरा सुरू झालेल्या रेल्वेमुळे चाकरमान्यांनी कोकण रेल्वेकडे पाठ फिरवली असली तरी ही सेवा आरामदायी तसेच इतर वाहतुकीच्या तुलनेत खिशाला परवडणारी आहे. ५ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असल्याचे आता माहीत झाले आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी ते रेल्वे सेवेलाच प्राधान्य देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

Web Title: The people of Konkan did not respond to the special train, which resulted in a delay in the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.