Video : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खार रोड स्थानकावर पेंटाग्राफचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:28 IST2018-11-15T20:44:37+5:302018-11-15T21:28:42+5:30

खार रोड स्थानकावरील पादचारी पुलावरून ओव्हरहेड वायरवर अज्ञाताकडून कपडा टाकण्यात आला होता.

Pentagraph blast at Khar road station, traffic disrupted by Western Railway | Video : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खार रोड स्थानकावर पेंटाग्राफचा स्फोट

Video : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खार रोड स्थानकावर पेंटाग्राफचा स्फोट

मुंबई : खार रोड स्थानकावरील पादचारी पुलावरून ओव्हरहेड वायरवर अज्ञाताकडून कपडा टाकण्यात आला होता. लोकलवरील पेंटाग्राफ आणि ओएचइ यांचा संपर्क आल्यामुळे शॉट सर्किट होऊन कपड्याने पेट घेतल्याने जलद मार्गावरील लोकल फेऱ्या थांबवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. तत्पूर्वी आगीमुळे पश्चिम रेल्वेची जलद मार्गावरील डाऊन मार्गावर वळवण्यात आली आहे. सुमारे 20 ते 25 मिनिटे जलद मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने होत असल्याने प्रवाशांनी रेल्वे रूळावरून जवळचे स्थानक गाठले. 7 वाजून 50 मिनिटे ते 8 वाजून 20 मिनिटे या कालावधीत डाऊन जलद लोकलवरील वाहतूक खंडित करण्यात आली होती, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

Web Title: Pentagraph blast at Khar road station, traffic disrupted by Western Railway

टॅग्स :localलोकल