Join us

दादर येथील पादचारी पूल उद्यापासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 20:23 IST

२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान या पुलाच्या भागाची दुरूस्ती केली जाईल

ठळक मुद्देया कामासाठी फलाट क्रमांक २ तसेच ३ वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा काही भाग बंद करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामादरम्यान प्रवाशांनी पर्यायी पुलांचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मुंबईमध्य रेल्वे मार्गावरील दादर येथील पादचारी पुलाची दुरुस्ती करण्यासाठी पूल २३ नोव्हेंबरपासून बंद केला जाणार आहे. दादर येथील पादचारी पूल खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक २ तसेच ३ वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा काही भाग बंद करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान या पुलाच्या भागाची दुरूस्ती केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या पुलाचा प्रवासी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे दुरुस्ती कामादरम्यान प्रवाशांनी पर्यायी पुलांचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :दादर स्थानकमुंबईमध्य रेल्वे