परळची ‘बेस्ट’ कर्मचारी वसाहत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 02:12 AM2019-11-12T02:12:32+5:302019-11-12T02:12:36+5:30

बेस्ट कर्मचारी वसाहतींच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो.

Pearl's 'Best' staff awaiting colony repairs | परळची ‘बेस्ट’ कर्मचारी वसाहत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

परळची ‘बेस्ट’ कर्मचारी वसाहत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : बेस्ट कर्मचारी वसाहतींच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो. मात्र, स्ट्रक्चरल आॅडिटनुसार सहा महिन्यांपूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असताना, परळ येथील कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून सुरू असलेल्या या दिरंगाईबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या वसाहतीमध्ये १,०६० कर्मचारी कुटुंबासह राहत आहेत. ही इमारत धोकादायक झाली असून, अनेक वेळा दुर्घटना घडत आहेत. यामुळे रहिवासी हवालदिल झाले असल्याचे शिवसेनेचे अनिल कोकिळ यांनी निदर्शनास आणल्यानंतर महाव्यवस्थापकांनी स्वत: तेथे पाहणी केली होती. मात्र, परळ कर्मचारी वसाहतीमधील ए, एम, ओ, पी इमारतींचा छज्जा आणि ड्रॉप वॉल कापून काढण्याच्या कामाचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर मांडण्यात आला.
यावर सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसाहतींचा मेंटेनन्स कापून घेता, मग त्यांना नागरी सुविधा का देत नाही? असा सवाल सदस्यांनी केला. मुंबईतील सर्व बेस्ट कर्मचारी वसाहतींचे स्ट्रक्चरल आॅडिट व्हीजेटीआय, आयआयटीसारख्या संस्थांकडून करून घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यानुसार, इमारतीच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
>दुरुस्तीबाबत विशेष बैठक
इमारतीच्या बांधकामानंतर ३० वर्षांनी स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक दुरुस्ती करून घ्यायची गरज असते. मात्र, बेस्ट वसाहती, बस आगाराच्या अनेक इमारती ५० ते ६० वर्षांनंतर नव्याने बांधण्याऐवजी त्यांची फक्त डागडुजी करण्यात येते. याबाबत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला असता, या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेऊन ठोस धोरण तयार करण्यात येईल.
- अनिल पाटणकर,
अध्यक्ष, बेस्ट समिती.

Web Title: Pearl's 'Best' staff awaiting colony repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.