पायलच्या मानेवर आढळल्या खुणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 06:16 IST2019-05-30T06:15:50+5:302019-05-30T06:16:02+5:30

नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या मानेवर खुणा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.

 Payal found on the neck! | पायलच्या मानेवर आढळल्या खुणा!

पायलच्या मानेवर आढळल्या खुणा!

मुंबई : नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या मानेवर खुणा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मात्र, मृत्यूचे निश्चित कारण समजेपर्यंत तो राखून ठेवण्यात येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२२ मे रोजी पायल तडवीने (२६) नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २३ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० च्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालासंबंधी अधिक माहितीसाठी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना विचारले असता, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर कोणतेही भाष्य करता येणार नाही. तशी परवानगीही नसल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.
शवविच्छेदन अहवालातून उघड
मृत्यूचे निश्चित कारण कळेपर्यंत अहवाल राखून

Web Title:  Payal found on the neck!