वीजबिलाची थकबाकी भरा, नाही तर कारवाईला सामोरे जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:37 IST2024-12-01T10:36:59+5:302024-12-01T10:37:11+5:30
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे.

वीजबिलाची थकबाकी भरा, नाही तर कारवाईला सामोरे जा
मुंबई : वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे, त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जागामालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई मात्र होऊ शकते.
अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत आहे.
योग्य पुरावे द्या, वीज कनेक्शन घ्या...
३१ मार्चपर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून ही अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपला. मात्र आता योजनेस एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीजग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा आहे.
जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरणाऱ्यांना मिळणारी सूट
भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ आणि कळवा या महावितरणच्या फ्रॅन्चायजी क्षेत्रातील ग्राहकांनाही ही योजना लागू आहे.
उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना बिल भरणाऱ्यांना मिळणारी सूट
६५,४४५ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये ८६ कोटी रुपये भरले आहेत. त्या ग्राहकांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे.
ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल.
१९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून यासंबंधीची माहिती घेता येईल.