Join us

एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 19:13 IST

देवेंद्र फडणवीस यांची अनिल परब यांच्याकडे मागणी

 

मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा पगार ५० टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष वेतन वाढ देणे आवश्यक आहे.  मात्र याविरूद्ध म्हणजे ५० टक्के वेतन देणे चुकीचे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात यावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन जुन मध्ये एकूण वेतनाच्या ५० टक्केच वेतन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. अशा अत्यावश्यक परिस्थितीत काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष वेतनवाढ देणे आवश्यक असताना, त्या विरूद्ध त्यांचे ५० टक्के वेतन अदा करने हे बरोबर नाही. कोरोनामध्ये आपला जीव धोक्यात घालून एसटी कर्मचारी सेवा देत आहे. त्यामुळे एसटीची सेवा अविरत सुरु आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले पाहिजे. यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसरस्ते वाहतूक