रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारांना पालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 02:18 AM2019-11-24T02:18:39+5:302019-11-24T02:18:55+5:30

पावसाळ्यानंतर भरण्यात आलेल्या खड्ड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर संबंधित दोन ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे.

The paving of roads is of poor quality | रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारांना पालिकेची नोटीस

रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारांना पालिकेची नोटीस

Next

मुंबई : पावसाळ्यानंतर भरण्यात आलेल्या खड्ड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर संबंधित दोन ठेकेदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे़ दिलेल्या मुदतीत खड्डे पुन्हा व्यवस्थित न भरल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, अशी ताकीद पालिकेने दिली आहे़
या वर्षी मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली़ अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ पावसाळ्यानंतर हे खड्डे भरण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले़ हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे़ मुलुंड येथील भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची पाहणी करून खराब कामे पालिकेच्या अभियंत्यांना दाखवून दिली़ त्यानंतर, पालिकेने मे़ सनराईज स्टोन इंडस्ट्रीज आणि मे़ ट्रान्स कंडक्ट या ठेकेदारांना नोटीस पाठविली आहे़
या नोटीसनुसार संबंधित ठेकेदारांनी केलेल्या रस्त्यांच्या कामात गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे़ टी विभाग कार्यालयाच्या सहायक अभियंत्याने ही बाब कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणली होती़ निकृष्ट दर्जाचे हे काम अभियंत्यांना दाखवून दिल्यानंतर संबंधित ठेकेदारांना नोटीस काढण्यात आल्याचे, आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले़
हे रस्ते हमी कालावधीतील आहेत़ त्यामुळे गुरुवारी पालिका प्रशासनाने नोटीस पाठविली असून, ठेकेदारांना त्यांचे काम सुधारण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे़

हे आहेत ते रस्ते़़ : बी़पी़ क्रॉस रोड क्ऱ ३, टाटा कॉलनी (पल्लवी सेक्टर), म्हाडा कॉलनी रोड, आरपी क्रॉस रोड, टाटा कॉलनी, बी़पी़ क्रॉस रोड नंबर चार, जीजीएस रोड, बी़पीक़्रॉस रोड नंबर १, महाकवी कालिदास रोड, टाटा कॉलनी(इमारत क्ऱ १३ आणि १४), नवघर गल्ली रोड, आऱपी़रोड़, नाहूर पुलावरील काम़
 

Web Title: The paving of roads is of poor quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.