Patients suffering from shadowy confusion in the system at Covid Care Center | कोवीड केअर सेंटरमध्ये यंत्रणामधील सावळ्य गोंधळाचा फटका रुग्णांना

कोवीड केअर सेंटरमध्ये यंत्रणामधील सावळ्य गोंधळाचा फटका रुग्णांना

ठाणे : ठाणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. परंतु दुसरीकडे महापालिका प्रशासनाने कोरोनाबाधीत रुग्णांसाठी सुरु केलेल्या १०२४ बेडच्या कोवीड केअर सेंटरमध्येही रुग्णांवर उपचार होत आहेत. आजही येथे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या ठिकाणी आधीच तज्ञ डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारी वर्गाचा तुटवडा आहे. वारंवार आपल्या माध्यमातून जाहीरात देऊनही डॉक्टर अथवा इतर स्टॉफ मिळू शकलेला नाही. त्यामुळे तुटपुंज्या स्टॉफच्या सहाय्याने येथील कारभार हातळला जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, नेर्सेसवर अतिरिक्त ताण येणे हे स्वाभावीकच आहे. परंतु असे असतांनाही येथील यंत्रणांमधील डॉक्टर किंवा इतर स्टॉफमध्ये ताळमेळ नसल्याने त्याचा फटका येथे उपचार करण्यासाठी येत असलेल्या रुग्णांना नाहक सहन करावा लागत असल्याची तक्रार कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
डॉक्टरांमध्येही आपसात ताळमेळ नसल्याचे प्रकार येथे मागील काही दिवसापासून घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाची प्रकृती अस्वस्थ असतांना येथील सकाळच्या ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णाचे डिसार्च्ज तयार केले. दुपारी आलेल्या डॉक्टरानी तुम्हाला पुढील दोन ते तीन दिवसात डिसार्च्ज देण्यास हरकत नाही असे सांगितले. तर सांयकाळी आलेल्या डॉक्टरांनी तुम्हाला सध्या उपाचाराची गरज असतांना डिसार्च्ज कसा काय दिला जात आहे, असा उलट सवाल त्या रुग्णाला विचारला. त्यामुळे रुग्ण आणखीनच घाबरला. शिवाय त्या डॉक्टरने डिसार्ज्चही रद्द केला. तसेच येथे रक्त तपासणीची लॅब असतांनाही रुग्णाचे रक्त तपासणीचे अहवाल वेळेत मिळत नसल्याचे दिसत आहे. अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने रुग्णांना वेळेवर उपाचारही मिळत नाहीत. अशा अनेक घटना येथे वारंवार घडत आहेत, त्यात डॉक्टरांमध्ये सावळा गोंधळ असल्यानेही त्याचा नाहक फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा सावळा गोंधळ दूर करुन रुग्णांना वेळेत आणि योग्य ते उपचार मिळावेत ही विनंती. शिवाय येथे रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या टॉलेटची देखील असुविधा आहे. ती देखील तत्काळ दूर करावी अशीही विनंती या पत्राद्वारे करीत आहे. पुढील काही दिवसात हा सावळा गोंधळ दूर झाला नाही, तर कॉंग्रेसच्या माध्यमातून आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. या संदर्भात त्यांनी लेखी निवेदन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Patients suffering from shadowy confusion in the system at Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.