Join us

Mumbai Building Collapse : खारमध्ये पाच मजली इमारतीचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 15:22 IST

Mumbai's Khar Building Collapse : खार रोडमधील पूजा अपार्टमेंट इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वर  कोसळला आहे.

मुंबई: खार रोड पश्चिममधील पूजा अपार्टमेंट या पाच मजली इमारतीचा काही भाग खार रोड क्र. 17वरील रस्त्यावर  कोसळला आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 वर्षाची चिमुकली अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान इमारतीच्या जिन्याचा काही भाग खार रोड क्र.17वर कोसळला आज दुपारी १.१५ मिनिटांच्या आसपास अचानक कोसळला. तसेच रहिवाश्यांना इमारतीतून बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 10 वर्षाची माही मोटवानी अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे प्राथमिक माहितीनूसार ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :डोंगरी इमारत दुर्घटनामुंबई