Join us

क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीचा भाग कोसळला; 17 जणांना वाचविण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 01:28 IST

आपत्तकालीन व्यवस्थेकडून बचाव कार्य आणि ढिगारा काढण्याचे काम रात्रभर सुरू होते

मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील तळ अधिक तीन मजली युसुफ इमारतीचा भाग मंगळवारी रात्री ९.१५ च्या सुमारास कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

आपत्तकालीन व्यवस्थेकडून बचाव कार्य आणि ढिगारा काढण्याचे काम रात्रभर सुरू होते. दुर्घटनाग्रस्त इमारत ही म्हाडाची उपकर प्राप्त (सेफ) असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव दुघटनाग्रस्त इमारतीच्या लगतच्या दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

१७ जुलै २०१९ रोजी डोंगरी येथे इमारत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा इमारत दुर्घटना झाल्याने परिसरात घबराट आहे. महापालिकेने धोकादायक इमारतींचे ऑडीट करून त्या खाली कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केलीआहे.

टॅग्स :डोंगरी इमारत दुर्घटना