Join us
Daily Top 2Weekly Top 5

“शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणे आवश्यक, कितीही अपशकून केला…”; संजय राऊतांनी ठाम सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:12 IST

Sanjay Raut News: शरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News:शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने दिल्लीत असणे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत असणे असे आहे, हे त्यांना म्हणालो होतो. शरद पवारांनी निवडणूक लढायचे असे ठरवले तर आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीकडे तेवढी मते जरूर आहेत. त्यामुळे शरद पवार यांना कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त झाले तरी एक खासदार निवडून जाईल. निवडणूक बिनविरोध करायची की नाही हे सरकारने ठरवावे. पण शरद पवार यांनी संसदेत असावे. शरद पवारांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे

शरद पवार यांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे. आघाडी म्हणून आमच्याकडे मतांपेक्षा जास्त कोटा आहे. इतरांनी कितीही अपशकून केला, विशेषत: दिल्लीतून अपशकून झाला तरी तो यशस्वी होणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक आहे. बाकी हवाबाजी आहे. शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणे गरजेचे आहे. मी शरद पवारांशी या विषयी अनेकदा बोललो आहे. आमच्या दोघांची चर्चा झाली आहे. एकदा तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरच बोललो होतो. आता थांबायला पाहिजे अशी शरद पवारांची मानसिकता आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. रहस्य शोधण्याची त्यांच्यात क्षमता आहे. सतत माहिती येत असते त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार काही माहिती देत असतील तर महाराष्ट्र ऐकण्यास उत्सुक आहे. आम्ही दादा प्रेमी आहोत. मी याबाबत स्वत: रोहित पवारांशी बोलणार आहे. मी स्वत: दादांच्या जाण्याने अस्वस्थ आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's presence in Delhi essential, says Sanjay Raut firmly.

Web Summary : Sanjay Raut insists Sharad Pawar should be in Delhi, representing Maharashtra's voice. MVA can elect him; no need to beg. Raut wants Pawar to contest elections, defying Delhi's negativity. He also expressed concern over Dada's departure.
टॅग्स :राज्यसभानिवडणूक 2026संसदसंजय राऊतशरद पवार