Join us  

मंडपाच्या परवानगीत आॅनलाइन विघ्न  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:45 AM

झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत.

मुंबई - झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत. परवानगी नसल्यामुळे मंडपही बांधता येत नसल्याने गणेशमूर्तींचे आगमन लांबणीवर पडले आहे.दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आॅफलाइन मिळत असे. मात्र, परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने, मंडळांच्या मागणीनुसार महापालिकेने या वर्षीपासून आॅनलाइन पद्धत सुरू केली. त्यानुसार, महापालिकेच्या परवानगीनंतर पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल अशी इतर परवानगी मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे तीन दिवसांत अपेक्षित असलेल्या आॅनलाइन परवानगीला बराच कालावधी लागत आहे.तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे मंडप उभारता येत नसल्याने गणेशमूर्ती आणता येत नाही. सजावट, चलचित्र, देखावे उभारण्यासही विलंब होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षी प्रमाणे २,२०० मंडळांना परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पालिकेला केल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी नरेश दहिबावकर यांनी सांगितले.आॅफलाइनचा तोडगामंडळांकडून अर्ज भरून घेऊन नंतर त्याचे रूपांतर आॅनलाइन करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.परवानगी मिळण्यास यामुळे विलंबमहापालिकेच्या परवानगीनंतर स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचीही स्वतंत्र परवानगी मंडळांना घ्यावी लागत आहे. ही परवानगी मिळण्यास बराच कालावधी जात आहे. आॅनलाइन अर्ज भरण्यात गणेशोत्सव मंडळांना अडचणी येत आहे, तसेच सर्व्हर बंद झाल्यावर दोन दिवसांनी येण्यास विभाग कार्यालयातून सांगण्यात येत आहे.अनेक गणेशमूर्तींचे आगमन लांबणीवरगेल्या काही वर्षांत सार्वजनिक मंडळांमध्ये सजावटी व देखाव्यांची स्पर्धा रंगू लागली. त्यासाठी परवानगी मिळण्याआधीच मंडप उभारून महिनाभर आधीच गणेशमूर्ती मंडपात आणून ठेवण्यात येते. त्यानंतर, सजावट, कलाकुसर, देखावे उभारले जातात. पाऊस पडल्यास मंडपात पाणी गळते का? हे पाहावे लागते. मात्र, या वेळेस परवानगीनंतरच मंडप असा नियम करण्यात आल्याने, अद्याप अनेक मंडळांना मंडप उभारता आलेले नाहीत. यामुळे सार्वजनिक सुट्टी व रविवारी होणारे गणेशमूर्तींचे आगमन लांबणीवर पडले आहे.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई