Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाडमध्ये मारहाण, वाहने पेटवल्याची बातमी निव्वळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 10:32 IST

मुंबईमधील मालाड भागामध्ये पार्किंगच्या वादातून दोन गटात मध्यरात्री जोरदार राडा झाला.

मुंबई : मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात मध्यरात्री जोरदार मारामारी आणि नंतर वाहने पेटवून दिल्याची बातमी निव्वळ अफवा असून वाहनांना आग लागल्याची घटना खरी असल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी स्पष्ट केले आहे. 

या ठिकाणी लावलेल्या पाच रिक्षांना आग लागली होती. मात्र, ती आग जवळच असलेल्या कचरापेटीत कचरा जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीमुळे लागल्याची शक्यता आहे. याठिकाणी हाणामारीचा कोणताही प्रकार घडला नसून आगीचे नेमके कारण आम्ही शोधत आहोत, असेही राजेशिर्के यांनी सांगितले. 

मालाड पश्चिमेला ही घटना घडली. अज्ञातांविरोधात भादंवि कलम 435 नुसार दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईआगऑटो रिक्षामोटारसायकल