Join us

खोटा आरोप करण्याची पालकांची मानसिकता नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 05:52 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली.

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली.पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने २०१४मध्ये राजेंद्र भीमा असुदेव याला पॉक्सो व भारतीय दंड संहितेअंतर्गत दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात राजेंद्र याने उच्च न्यायालयात आव्हान दिले.मुलीच्या कुटुंबीयांनी एका स्थानिक राजकीय नेत्याच्या वतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा खोटा आरोप केला आहे. संबंधित राजकीय नेता आणि आपल्यामध्ये वैर असल्याने अशा प्रकारे आपल्याला अडकविण्यात आले आहे, असे राजेंद्र याने याचिकेत म्हटले आहे. मात्र उच्च न्यायालयाने त्याचा युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दिला.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट