पालकांनो सावधान! शाळेतील खोडसाळपणा नडला,१३ वर्षाच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकली...; मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:14 IST2026-03-11T08:56:36+5:302026-03-11T09:14:20+5:30
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांने टाचणी गिळली गेल्याचे समोर आले आहे.

पालकांनो सावधान! शाळेतील खोडसाळपणा नडला,१३ वर्षाच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकली...; मुंबईतील घटना
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा खोडसाळपणा जीवावर बेतण्याची वेळ आली होती. हा विद्यार्थी वर्गात विद्यार्थ्यांना टाचणी टोचत होता, या मुलाने शिक्षकांपासून लपण्यासाठी टाचणी तोंडात ठेवली. मात्र ही टाचणी चुकून गिळली गेली आणि थेट श्वासनलिकेत जाऊन अडकली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा वर्गात मित्रांना टाचणी टोचून मस्करी करत होता. यावेळी अचानक वर्गात शिक्षक आले. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने मुलाने घाईघाईत टाचणी तोंडात लपवली. पण काही क्षणातच ती टाचणी गिळली आणि फुफ्फुसाजवळील श्वासनलिकेत अडकली.
भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी का दिली? अमेरिकेने कारण सांगितले
त्या मुलाने टाचणी गिळल्यानंतर त्याला लगेच खोकला सुरू झाला. त्याला अचानक आलेला खोकला पाहून शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी मुलाचा एक्स-रे काढला असता त्याच्या फुफ्फुसाजवळ टाचणी अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर टीमने रिजिड ब्रॉन्कोस्कोपी या तंत्राचा वापर करून शस्त्रक्रिया केली. तोंडावाटे विशेष उपकरण आत टाकून फुफ्फुसांचे वायुवीजन सुरळीत ठेवत अवघ्या ३० मिनिटांत टाचणी बाहेर काढली.