Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 13:16 IST

आणखी दोन दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात आले आहे.

मुंबई - सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे. त्यामुळे अधिवेशनाचे आजचे कामकाज पूर्ण झाले असून मुंबई आणि महाराष्ट्राची सुरक्षा लक्षात घेता, अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपुष्टात आणण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात सांगितले. तसेच, याबाबत निवेदनही दिले. तसेच विरोधी पक्षनेते, गटनेते आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ चार दिवसांतच अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 13.20 तास कामकाज झाले आहे.

आणखी दोन दिवस चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच गुंडाळण्यात आले आहे. बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळविले. मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यास अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. तसेच आज सकाळीही बैठक झाली. त्यानंतर, आजच अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याच्या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन आज संपुष्टात येत असल्याची घोषणा केली.  

राज्यात हाय अलर्ट आहे. मोठया प्रमाणावर ‘इनपूट’ येत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. अधिवेशनासाठी 6 हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण वाढू शकतो, म्हणून अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करुन संपवून टाकू, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली. 

आजच बजेटला आणि लेखानुदानाला मंजुरी

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपणार हे रात्री उशिरा स्पष्ट झाले, कारण उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला व शेवटचा दिवस दाखवला आहे. अर्थसंकल्प मंजुरी व लगेचच लेखानुदानास मंजुरीही शुक्रवारी दाखवली आहे, शिवाय दुष्काळावरील चर्चाही कामकाजात दाखवलेली नाही. 

मुख्यमंत्र्यांनी निवेदनावेळी केलेल्या भाषणातील मुद्दे

मुंबईसारखं आर्थिक राजधानीचं शहरजास्त निगराणी राहिली पाहिजे, अशी पोलीस विभागाची भावनापॅनिक होण्याची परिस्थिती नाही, पण काळजी घेणं महत्त्वाचंम्हणून आपलं सत्र अजून दोन-तीन दिवस चाललं असतं...५ ते ६ हजार पोलीस अधिवेशन काळात कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात...पोलीस खात्याकडून जो फिडबॅक मिळाला, त्यानुसार अधिकची कुमक त्यांना मिळाली तर सोपं पडेल काळजी घेणं...सर्वपक्षीय बैठक बोलावली होती... पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि अन्य अधिकारी... त्यांनी परिस्थिती ब्रीफ केली... योग्य तो विचार करून विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते... एकमताने निर्णय घेतला... अधिवेशन आटोपतं घेऊ... पोलीस बल शहराच्या, राज्याच्या सुरक्षेसाठी मोकळा करावा...'पॅनिकची परिस्थिती नाही, पण राज्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची'; विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअर्थसंकल्पआमदारमुंबईएअर सर्जिकल स्ट्राईक