मेट्रो-५च्या कामाचा ‘पंच’, ठाणे-कल्याण-भिवंडी मार्गावरून धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:35 IST2018-04-13T02:35:46+5:302018-04-13T02:35:46+5:30
मेट्रो-२अ, मेट्रो-२ ब तसेच मेट्रो-३चे काम सुरू असताना आता मेट्रो-५च्याही कामासाठी एमएमआरडीए सज्ज झाली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी या मार्गावर मेट्रो-५चा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

मेट्रो-५च्या कामाचा ‘पंच’, ठाणे-कल्याण-भिवंडी मार्गावरून धावणार
मुंबई : मेट्रो-२अ, मेट्रो-२ ब तसेच मेट्रो-३चे काम सुरू असताना आता मेट्रो-५च्याही कामासाठी एमएमआरडीए सज्ज झाली आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी या मार्गावर मेट्रो-५चा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या भागातील प्रवाशांना लवकरात लवकर मेट्रोेचा लाभ घेता यावा यासाठी एमएमआरडीएने तातडीने पावले उचलली आहेत. या मार्गावर संकल्पचित्र सल्लागार नियुक्त करण्यासाठी एमएमआरडीएने ई-निविदा मागवल्या आहेत. या ई-निविदांमधून जे निविदाधारक पात्र ठरतील त्यांच्याकडून या संपूर्ण मार्गाचे संकल्पचित्र, संपूर्ण २४ कि.मी. मार्गाचे बांधकाम, १७ रेल्वे स्टेशन, कार डेपो इत्यादी महत्त्वाची कामे तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत.
२४ किलोमीटर लांबी असलेल्या ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो-५ प्रकल्पाचे काम ज्या ठेकेदाराला मिळेल त्याला ते आॅर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. १८ मे २०१८ ही ई-निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. २०२२ पर्यंत मेट्रो ५ चे काम पूर्ण होईल. त्यामुळे भिवंडी, कल्याण, ठाणे या मार्गावरील प्रवाशांना मुंबई, नवी मुंबई भागात जलदरीत्या पोहोचण्यासाठी मेट्रो-५ चा पर्याय खुला होणार आहे. भिंवडीपर्यंत कोणतीही उपनगरीय रेल्वेसेवा उपल्ब्ध नसल्याने महामार्गाशिवाय कुठला दुसरा पर्याय येथील प्रवाशांसाठी नाही. या प्रकल्पामुळे या मार्गावरील वाहतूककोंडीचाही प्रश्न सुटेल. त्यामुळे या भागातील प्रवासी मेट्रो-५ची आतुरतेने वाट पाहत आहेत. २४ किलोमीटर लांबी असलेल्या ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो-५ प्रकल्पाचे काम ज्या ठेकेदाराला मिळेल त्याला ते आॅर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे.
मुंबई : अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) अशा मेट्रो ७ प्रकल्पाचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून, या मार्गावर होत असलेल्या कामाचा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. हा प्रकल्प २०२१पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्याच्या कामाच्या वेगानुसार हा प्रकल्प दिलेल्या वेळेतच पूर्ण होईल, असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकाºयांना आहे.
या दौºयात एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी कंत्राटदार आणि सल्लागार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी पावसाळ्यादरम्यान सुरक्षा उपाययोजनांची विशेष काळजी घेऊन त्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले. या भेटीदरम्यान दराडे यांनी या मार्गावरील शंकरवाडी, आरे आणि पुष्पा पार्क स्टेशनची पाहणी केली.
असा असेल प्रकल्प
प्रकल्पाचे नाव - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५
एकूण अंतर - २४.९ कि.मी.
एकूण स्थानके - १७
सुरुवातीचे स्थानक - कापूरबावडी (ठाणे)
शेवटचे स्थानक - कल्याण एपीएमसी (कल्याण)
प्रकल्प या वर्षी होणार पूर्ण - सन २०२२
अंदाजे अपेक्षित खर्च - ८४१६ कोटी रुपये