Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोटनिवडणूक 2018 : पालघरमुळे युतीला घरघर; उद्धव ठाकरे पाच वाजता सांगणार मोठा निर्णय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:23 IST

दुपारपासून 'मातोश्री'वर शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं समजतं.

मुंबईः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या खडाजंगीमुळे भाजपा आणि शिवसेनेतील वाढलेला तणाव आता काडीमोडापर्यंत जाण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार असून त्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दुपारपासून 'मातोश्री'वर शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं समजतं. त्यात ते काय निर्णय घेणार, याबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे.

टॅग्स :पालघर पोटनिवडणूक 2018शिवसेनादेवेंद्र फडणवीसभाजपाउद्धव ठाकरे