Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन लावलेल्या वृद्धेला बसमधून नेले सायन रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 02:15 IST

नातवाची पोलिसांत तक्रार : गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : कांदिवलीतील महिला ग्यानतीदेवी विश्वकर्मा या कोरोनाबाधित महिलेच्या बाबतीत एमएमआरडीए हेल्थ केअर सेंटर आणि सायन रुग्णालयाकडून हलगर्जीपणा करण्यात आला. त्याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत लेखी तक्रार बीकेसी पोलिसांना देण्यात आली आहे.

‘निसर्ग’ वादळाच्या पार्श्वभूमीवर २ जून, २०२० रोजी आॅक्सिजन लावण्यात आलेल्या विश्वकर्मा यांना चक्क बसमधून सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच त्यांचा कांदिवलीतील पत्ता रुग्णालयाकडे असून तसेच त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेर असूनदेखील त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नाही. मृतदेह बेवारस म्हणून तो सायन स्मशानभूमीत नेण्यात येत होता. मात्र नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या हस्तक्षेपामुळे रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात थांबवून नंतर त्यांच्या नातवाने अंत्यदर्शन घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे आम्ही किरीट सोमय्या यांच्यासह केल्याचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले. बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. मुळे यांना फोन आणि एसएमएसमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही.मृत्यूची माहिती दिली नाहीच्विश्वकर्मा यांना चक्क बसमधून सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच त्यांचा कांदिवलीतील पत्ता रुग्णालयाकडे असून तसेच त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेर असूनदेखील त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नाही.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र