Join us
Daily Top 2Weekly Top 5

४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा, १७ ओबीसी; फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात तुल्यबळ स्थान

By यदू जोशी | Updated: December 16, 2024 06:17 IST

राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. पाहा, यादी...

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. ४२ मंत्र्यांपैकी १६ मराठा समाजाचे, तर १७ ओबीसींच्या विविध जातींचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ब्राह्मण समाजाचे दोन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रत्येकी दोन, तर मुस्लीम समाजाचे एक आणि जैन समाजाचे एक मंत्री आहेत. ओबीसीमध्ये माळी समाजाचे दोन, कुणबी समाजाचे तीन, बंजारा समाजाचे दोन आणि वंजारी समाजाचे तीन मंत्री आहेत. 

मराठा : १) राधाकृष्ण विखे पाटील,  २) चंद्रकांत पाटील, ३) नितेश राणे, ४) शिवेंद्रराजे भोसले, ५) मेघना बोर्डीकर, ६) आशिष शेलार, ७) एकनाथ शिंदे, ८)  शंभूराज देसाई, ९) योगेश कदम, १०) भरत गोगावले, ११) प्रकाश आबिटकर, १२) दादा भुसे, १३) अजित पवार, १४) बाबासाहेब पाटील, १५) मकरंद पाटील, १६) माणिकराव कोकाटे.  

ओबीसी : १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)

अनुसूचित जाती : १) संजय सावकारे (चर्मकार) २) संजय शिरसाट (बौद्ध)

अनुसूचित जमाती : १) अशोक उईके (आदिवासी) २) नरहरी झिरवाळ (आदिवासी) 

मुस्लीम : १) हसन मुश्रीफ 

जैन : १) मंगलप्रभात लोढा

ब्राह्मण : १) देवेंद्र फडणवीस, २) उदय सामंत (गौड ब्राह्मण) 

खुला प्रवर्ग : १) माधुरी मिसाळ (सीकेपी)

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज्य सरकारमंत्रिमंडळ विस्तारमहायुती