गणेशोत्सवासाठीच्या १,११० विशेष एसटी बसपैकी ९३५ बस फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:27 AM2019-08-07T05:27:11+5:302019-08-07T05:27:37+5:30

एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमित बससह विशेष २,२०० बस चालविण्यात येतील

Out of the 5 special ST buses for Ganeshotsav, 29 buses are full | गणेशोत्सवासाठीच्या १,११० विशेष एसटी बसपैकी ९३५ बस फुल्ल

गणेशोत्सवासाठीच्या १,११० विशेष एसटी बसपैकी ९३५ बस फुल्ल

Next

मुंबई : एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमित बससह विशेष २,२०० बस चालविण्यात येतील. या बसपैकी १,८८५ बस फुल्ल झाल्या आहेत. मुंबई विभागातून गणपतीसाठी चालविण्यात येणाºया १,११० विशेष बसपैकी ९३५ बस फुल्ल झाल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी २,२०० जादा विशेष एसटी बस सोडण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. यापैकी १,८८५ बस फुल्ल झाल्या असून, यातील १,०५४ बसचे सांघिक आरक्षण झाले. ३१ आॅगस्टला सर्वाधिक बसचे आरक्षण झाले. एकूण बसपैकी १,३०९ बस या दिवशी धावतील. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, उरण, पनवेल विभागांतून ९३५ बस फुल्ल झाल्या. उर्वरित १७५ बसचे आरक्षण सुरू आहे. परळ डेपोतून ३७८ पैकी ३५०, मुंबई सेंट्रलम डेपोतून ४०९ पैकी ३२५, कुर्ला डेपोतून ३०० पैकी २३५, उरण डेपोतून १४ पैकी १३ बस फुल्ल झाल्या आहेत. कमी गाड्या पनवेल डेपोसाठी पनवेल डेपोसाठी ९ विशेष बस देण्यात आल्या आहेत. मात्र या डेपोमधून १२ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे पनवेल डेपोसाठी अतिरिक्त ३ जादा बस लागणार आहेत.

Web Title: Out of the 5 special ST buses for Ganeshotsav, 29 buses are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.