'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 05:54 PM2023-09-21T17:54:37+5:302023-09-21T17:57:33+5:30

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत आमदार दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

otherwise one will have to seek treatment in Agra sometime' Mohit Kamboj's Reply to Ambadas Danvae Criticism | '....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर

'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत भाजप नेते मोहित कंबोज आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत आमदार दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी भेट देत श्री गणेश मुर्तीचे दर्शन घेतले. हा फोटो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेअर करत टीका केली. 

अजित पवार पुन्हा निघाले शपथविधीला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे असेही संकेत

अंबादास दानवेंची पोस्ट काय? 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोत हे दोन्ही नेते श्री गणेशाचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन लिहित दानवेंनी टीका केली आहे.

'निर्लजम्म सदा सुखी! देवाकडे पाठ, असे हे माठ... लाचारीत गुरफटलेली जोडी,
दोन मिंधे कपटी कारस्थानी गँग लाळघोटे
विश्वासघातकी गद्दार नौटंकीबाज  नीच - तिरस्कार ज्यांची संस्कृती खोट्या हिंदुत्वाचा ढोल बाजा
पाठीत वार, असे अनेक शब्द.... लवकरच सुचतील, डोक्यातील हवा उतरल्यावर!
गणपती बाप्पा मोरया!, अशी कॅप्शन देत टोला लगावला आहे. 

भाजप नेते मोहित कंबोज यांचे ट्विट काय?

या टीकेला आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'अंबादास दानवे जी, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही #Instagram वर माझ्याबद्दल आणि श्री प्रताप सरनाईकजींबद्दल फोटो टाकून जे लिहिले आहे ते उद्धवजींच्या व्यक्तिरेखेसारखे आहे. तुमची नजर दुसरीकडे कुठेतरी दिसतंय आणि तुमचं टार्गेट दुसरीकडे! श्रीगणेश तुला बुद्धी देवो हीच माझी प्रार्थना, नाहीतर कधीतरी आग्रा येथे उपचार घ्यावे लागतील, अशी कॅप्शन देत कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Web Title: otherwise one will have to seek treatment in Agra sometime' Mohit Kamboj's Reply to Ambadas Danvae Criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.