Orgy in Murud; Mumbai survived in cyclone nisarga | मुरूडमध्ये तांडव; मुंबई थोडक्यात वाचली

मुरूडमध्ये तांडव; मुंबई थोडक्यात वाचली

- टीम लोकमत । सचिन लुंगसे (मुंबई), आविष्कार देसाई (रायगड), हितेन नाईक (पालघर), जितेंद्र कालेकर (ठाणे), महेश सरनाईक (सिंधुदुर्ग), मनोज मुळ्ये (रत्नागिरी), श्याम बागुल (नाशिक), राजेंद्र शर्मा (धुळे) 


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. नंतर ठाणे जिल्ह्याच्या काही भागांकडे सरकले. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला त्याने चकवा दिल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित भागात या चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. बुधवारी रात्री उशिरा चक्रीवादळाचा जोर ओसरला. त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागला धडकलेले चक्रीवादळ आता उत्तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने सरकेल. जोपर्यंत हवामानातील बदल पूर्णत: कमी होत नाहीत तोपर्यंत मान्सूनच्या प्रवासाबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. जसे हे चक्रीवादळ दक्षिण मध्यप्रदेशाच्या दिशेने पुढे सरकेल, तसा त्याचा वेग आणि जोर कमी होईल. चक्रीवादळ रायगड किनारपट्टीच्या अधिक जवळ आले, तसा मुंबईच्या शहर आणि उपनगरांतील पावसाचा जोर वाढत गेला. कोळीवाडे, नद्या- मोठ्या नाल्यांना लागून असलेल्या वस्त्यांती २५ हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. शहरांत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.
नाशिकमध्ये जोरदार वादळी वारे
नाशिक परिसरात रात्री आठच्या सुमारास ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वारे वाहत होते. वादळी वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर भागात वादळामुळे विजेचे खांब उखडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मध्यरात्री धुळ्यात वादळ
निसर्ग चक्रीवादळ मध्यरात्री साक्री तालुक्यात प्रवेश करणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व तयारी केली आह, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

रायगडच्या सात तालुक्यांना तडाखा
रायगड जिल्ह्याच्या दक्षिण किनारपट्टीला मुरूड परिसरात दुपारी दीडच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात प्रामुख्याने अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, रोहा, उरण, माणगाव आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. विजेचा धक्का बसून अलिबागच्या उमठे येथे दशरथ बाबू वाघमारे (५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वादळाचा अंदाज घेऊन मंगळवारी
40,000
नागरिकांचे स्थलांतर करण्यात आल्याने जीवितहानी टळली.
चक्रीवादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडल्याने अलिबाग-रेवस, अलिबाग- पेण, मुरूड- माणगाव, मुंबई- गोवा महामार्ग बंद झाला. सात तालुक्यांत विजेचे खांब मोठ्या प्रमाणात कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात होत्या.

दापोली, मंडणगड,
मालवणला सर्वाधिक फटका
वाऱ्याचा वेग ताशी ९0 ते १२० किलोमीटर असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विविध ठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, रस्ते बंद होणे असे प्रकार घडले. सोसाट्याच्या वाºयासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे सर्वाधिक नुकसान दापोली, मंडणगड आणि मालवण तालुक्यांमध्ये झाले आहे. रत्नागिरीत ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. राजापूर तालुक्यातील सोलगाव, जैतापूर येथे घरांचे अंशत: नुकसान झाले. जैतापूर बाजारपेठेत पाणी भरले. दापोली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे अतोनात नुकसान झाले. दापोली - खेड रस्त्यावरही जीर्ण वृक्ष कोसळल्याने हा रस्ता बंद झाला. दापोलीतील स्टेट बँकेच्या इमारतीवरील पत्रा पूर्ण उडून गेला. दापोली तालुक्यातील हर्णै, मंडणगड तालुक्यातील वेळास या गावांना वादळाचा चांगलाच फटका बसला.

पालघरला तडाखा नाही : जिल्ह्यात चक्रीवादळाची तीव्रता फारशी न जाणवल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. समुद्रात मासेमारीला बंदी असतानाही वसई येथील मासेमारीला गेलेल्या दोन बोटींतील सुमारे ३० मच्छीमार वादळात अडकून पडले होते. मात्र, वादळाचा वेग मंदावल्याने ते वाचले.
ठाणे जिल्ह्यात एक जखमी : वादळी वारे व झाडे, भिंत कोसळल्यामुळे ठाणे जिल्ह्य
निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी साडेबारा ते अडीचच्या सुमारास रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागाला धडकले. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. आता या चक्रीवादळाचा प्रभाव मध्य महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशावर राहील. जोवर चक्रीवादळाचा जोर ओसरणार नाही, तोवर मान्सूनदेखील पुढे सरकरणार नाही. - शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागातील शहापूर, भिवंडी, मुरबाड
येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. उत्तनच्या किनारपट्टीलाही
पावसाचा तडाखा बसला. ठाणे शहरासह जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. मुंब्रा खडीमशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे (५५) जखमी झाले. मात्र कोणतीही मोठी हानी झाली नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Orgy in Murud; Mumbai survived in cyclone nisarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.