रुद्र महायोगचे आयोजन

By Admin | Updated: July 2, 2017 06:40 IST2017-07-02T06:40:02+5:302017-07-02T06:40:02+5:30

रुद्र युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे ‘रुद्र महायोग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान

Organizing Rudra Mahayogi | रुद्र महायोगचे आयोजन

रुद्र महायोगचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुद्र युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे ‘रुद्र महायोग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, घाटकोपर पूर्वेकडील रुद्र युनिव्हर्स फाउंडेशन बालाजी मंदिर सभागृहात संस्थेच्या संस्थापिका गुरुश्री विदुषी हा कार्यक्रम सादर करतील. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
आतापर्यंत ज्या लोकांनी रुद्र महायोगचा आनंद घेतला आहे आणि जे रोज त्याचा रियाज करतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप फायदे झाले आहेत, असे संस्थेचे म्हणणे आहे.
हा कार्यक्रम १७ वर्षांवरील सर्वांसाठी विनामूल्य आहे. मात्र, त्यासाठी ६ जुलैपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. परिणामी, इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. रुद्र महायोग केल्याने, तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांमध्ये कायमचे परिवर्तन दिसून येईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

Web Title: Organizing Rudra Mahayogi