Join us

महिला दिनानिमित्त गोवंडीत मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 20:34 IST

यावेळी मासिक पाळी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

मुंबई- आज(दि. 8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबईच्या गोवंडी भागात मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाये आयोजित करण्यात आले होते. यावेळी सूमारे दोनशे महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मैना महिला फाउंडेनवतीने यावेळी मासिक पाळी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमात काही महिलांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाला योगेश सानप(संचालक, नॅशनल स्कूल, लल्लूभाई, मानखूर्द) आणि चंद्रकांत जाधव (केतकी पब्लिकेशनचे संस्थापक) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हेल्थ क्विझ, सेल्फी पॉईंट इत्यादी सह विविध मनोरंजक उपक्रम आयोजित केले. कार्यक्रमात मैना महिला फाउंडेशनकडून विविध स्टॉलदेखील लावण्यात आले होते. 

टॅग्स :जागतिक महिला दिनमुंबई